esakal | ...म्हणून फुटले मेघोली धरण ; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा पाच गावांना बसला मोठा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Megholi Leak

सांडवा फुटला, आता सर्व बंधारा फुटू नये, अशी मागणी मेघोलीसह इतर ग्रामस्थांनी केली होती.

...म्हणून फुटले मेघोली धरण ; पाच गावांना बसला मोठा फटकाच

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : मेघोली (ता. भुदरगड) (Megholi Leak)लघुपाटबंधारे तलावाच्या गळतीकडे पाटबंधारे विभागाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची शिक्षा मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ गावाला भोगावी लागत आहे. ग्रामस्थांनी ज्या गळतीबद्दल वारंवार विचारणा केली, तीच गळती बंधारा फुटण्यास कारणीभूत ठरली आहे.

जुलैमध्ये मेघोली तलावाचा सांडवा फुटला होता. त्यामुळे नुकसान झाले होते. सांडवा फुटला, आता सर्व बंधारा फुटू नये, अशी मागणी मेघोलीसह इतर ग्रामस्थांनी केली होती. यावर्षी मोठा पाऊस सुरू होण्याआधी पाटबंधारे विभागाने काही सिमेंटची पोती आणि वाळू वरूनच ओतून गळती थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ग्रामस्थांची समजूत काढत वेळ मारून नेण्याच्या वृत्तीमुळे आज ३०० हेक्‍टर शेती मातीमोल झाली. एक महिला आणि अकरा जनावरांना मृत्यू झाला. पाटबंधारे विभागाकडून आजही आपली चूक मान्य करण्याची भूमिका न ठेवता, बंधारा फुटण्याचे कारण वेगळेच दाखवण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत.

बंधाऱ्याच्या भरावामध्ये पाण्याचा ऑऊट लेट आहे. याची भरावामधील चेंबरच्या बाजूला मोठी गळती आहे. बंधारा पूर्णक्षमतेने भरल्यामुळे गळतीतील पाण्याचा प्रवाह उच्चदाबाने सुरू झाला आहे. पाण्याच्या दबावाने भराव पोखरण्यास सुरुवात झाली. दिवसेंदिवस बंधाऱ्यातून गळती झालेल्या पाण्याचा प्रवाह वाढतच राहिला. ग्रामस्थांनाही स्तांनाही याची भीती वाटू लागली. त्यामुळे, मेघोलीसह इतर ग्रामस्त तीन महिन्यापासून गळती काढण्यासाठी याचा पाठपुरावा करत होते. गळती काढा किंवा बंधाऱ्यातील पाणी सोडा, अशी मागणी करत होते; पण अधिकाऱ्यांनीही काय होतंय, अशीच भूमिका घेत केवळ गळती काढण्यासाठी जुजबी हालचाल केली. त्यामुळे गळती थांबली नाही. हळूहळू करत शंभर ते दीडशे फुटाच्या बंधाऱ्याचा भराव पाण्याने भुसभूसीत झाला आणि बुधवारी रात्री तो भराव पाण्यासह मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर गावाला मातीमोल करून गेला.

मेघोली लघुबंधाऱ्याला गळती होती. वारंवार तक्रार देऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शेतकरी व ग्रामस्थांवर हा प्रसंग ओढवला आहे. दिवसाचा बंधारा फुटला असताना जीवितहानी मोठी झाली असती. महिन्यापूर्वीही तक्रार दिली होती; पण काहीही कारवाई झाली नाही. केवळ काही सिमेंटची पोती यावर ठेवली आणि निघून गेले होते.

- विनोद राऊळ, ग्रामस्थ, मेघोली (ता. भुदरगड)

loading image
go to top