esakal | मेघोली तलावात 11 जनावरे गेली वाहून, 300 हेक्टर शेतीचंही नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

megholi

मेघोली : 11 जनावरे गेली वाहून, 300 हेक्टर शेतीचं नुकसान

sakal_logo
By
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मेघोली तालुका भुदरगड येथील लघु बंधारा तलाव फुटल्याने अकरा जनावरे वाहून गेले असल्याचा पंचनामा आज सकाळी पूर्ण करण्यात आला. यामध्ये 8 म्हशींचा समावेश आहे. तर मेघोली, तळकरवाडी, नवले, सोनुर्ली, वेंगळूर व ममदापुर 300 हेक्‍टर जमीन वाहून केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मेघोली येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांना दिलासा दिला.

हेही वाचा: भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मेघोली लघु बंधाऱ्याची आज पाहणी केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मेघोली लघु बंधाऱ्याची आज पाहणी केली.

काल रात्री साडे दहाच्या सुमारास हा लघु बंधारा तलाव फुटला. आणि यात नवले गावातील एका महिलेचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

loading image
go to top