कोल्हापूर : टेंबलाई उड्डाणपुलाजवळ (Temblai Flyover) महापालिकेच्या कचरा डंपरच्या धडकेत चाकाखाली सापडून दिनेशसिंग साहबसिंग नायक (वय ३३, रा. टाकाळा, मूळ रा. सादाबाद, जि. हातरस, उत्तर प्रदेश) जागीच ठार झाला. मेहंदी आर्टिस्ट (Mehndi Artist) असणारा दिनेशसिंग टीव्हीएस शोरूमसमोरून रस्ता ओलांडत असताना डंपरने त्याला धडक दिली.