कलापूरशी लतादीदींच खास नातं; जडणघडणीत कोल्हापूरचा मोलाचा वाटा

लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले.
लतादीदी
लतादीदीesakal

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांचं आज वार्धक्यानं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान, मनोरंजन, कलेसह विविध क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा प्रवास थक्क करणार आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून लतादीदींनी (Lata Mangeshkar) संगीत प्रवासाला सुरुवात करत कौटुंबिक परिस्थितीला सावरण्यासाठी संगीताचाच आधार घेतला. अखंड संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या एका युगाचा आज अंत झाला आहे. मात्र या सगळ्यात लतादीदींच्या या संघर्षमय जडणघडणीत कोल्हापूरचा (Kolhapur) मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जडणघडणीची मुळं कलापूर म्हणजेच कोल्हापुरात रोवली गेली. लता मंगेशकर यांना दीनानाथ यांनी आपल्या फिल्म कंपनीत संधी दिली. आणि यशाची मुहुर्तमेढ रोवत त्यांनी हा प्रवास सुरु केला. (Lata Mangeshkar Memories With Kolhapur)

लतादीदी
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला PM मोदी राहणार उपस्थित

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर (Indore) शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लतादीदी या सर्वात ज्येष्ठ कन्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडं. लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. आई माई मंगेशकर आणि उषा, आशा, मीना व हृदयनाथ यांच्यासह लतादीदी कोल्हापुरात आल्या. सुरुवातीच्या काळात मंगेशकर कुटुंब मंगळवार पेठ खरी कॉर्नर येथे बाबूराव पेंटर यांच्या घराजवळ राहत होते. कुटुंब चालवण्यासाठी त्या मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये काम करू लागल्या. याआधीच त्यांची कारकीर्द खरंतर १९४२ च्या दरम्यान बालअभिनेत्री म्हणून सुरू झाली होती. पुढे मास्टर विनायक यांनी आपल्या फिल्म कंपनीचे मुंबईला स्थलांतर केल्यानंतर त्यांचे कर्मचारीही मुंबईला स्थायिक झाले. पुढे लतादीदींना भालजी पेंढारकर (Bhalaji Pendharkar) यांचा सहवास लाभला. भालजी कोल्हापुरात आल्यानंतरही त्यांचा लतादीदींशी स्नेह कायम होता.

लतादीदी भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. लता मंगेशकर या 'भारतरत्‍न' (Bharat Ratna Award) पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न - १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. संगीत (Music Industry) क्षेत्रातील वेगवेगळे विक्रम लता मंगेशकर यांच्या नावावर नोंदले गेले आहे. त्यात सर्वाधिक चित्रपटांमध्ये गायन, सर्वाधिक गाण्यांचे गायन, वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन अशा प्रकारचे ते विक्रम आहेत.

लतादीदी
Lata Mangeshkar: दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com