Kolhapur Theft : मेतकेतील दागिने चोरीचा उलगडा; कर्नाटकातील एकास अटक, ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Metke car Thef : मेतके (ता. कागल) येथील सत्यवादेवी मंदिरासमोर उभी असलेल्या मोटारीची काच फोडून ४१ तोळे सोने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. कर्नाटकातील संशयिताला दावणगेरे येथे सापळा रचून अटक करण्यात आली.
police arrest car and gold theft case 

police arrest car and gold theft case 

sakal

Updated on

मुरगूड : मेतके (ता. कागल) येथील सत्यवादेवी मंदिरासमोर रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीची मागील काच फोडून ४१ तोळे सोने आणि ५० हजार रुपये रोख रकमेची बॅग चोरट्यांनी पळवली होती. याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातील वीरेश नागार्जाप्पा (वय ४४, रा. हेलेपेट, दावणगेरे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५३ लाख ४२ हजार ३३४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com