esakal | म्हाळेवाडी: स्मशानशेडच्या काँक्रीटीकरणातून गेट टुगेदर
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळेवाडी: स्मशानशेडच्या काँक्रीटीकरणातून गेट टुगेदर

म्हाळेवाडी: स्मशानशेडच्या काँक्रीटीकरणातून गेट टुगेदर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, अशोक पाटील

कोवाड: गेट टुगेदर म्हटले की हार, तुरे, सत्कार आणि जेवण अशी संकल्पना रुढ होताना दिसते. पण म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील आम्ही म्हाळेवाडीकर व्हॉटसअॅप ग्रुपच्याच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या मित्रांनी गावच्या स्मशानशेडमध्ये श्रमदानातून कॉंक्रीटीकरण करुन गेट टुगेदर साजरा केला.

हेही वाचा: सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका

चार वर्षापासून आम्ही म्हाळेवाडीकर व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून या तरुणांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. आर्थिक मदत करणे, गावची व स्मशानभूमिची स्वच्छता करणे, कोरोनात सॅनिटायझर व मास्क पुरवणे अशी अनेक विकासात्मक कार्य हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रुपचे अॅडमीन सरपंच सी. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपमधील सहभागी मित्रांनी आतापर्यंत लाखो रुपयांची सामाजिक कामे गावात केली आहेत. सध्या ग्रुपमधील सर्व मित्र गणपतीसाठी गावी आले आहेत.

दोन दिवसात त्यांनी ४० हजार रुपयांचा निधी जमा करुन स्मशानशेडमध्ये कॉंक्रीटीकरणाचा निर्णय घेतला. स्मशानशेडची लांबी २० बाय ६० आहे. यामध्ये मित्रांनी श्रमदानातून जमिनीची सपाटीकरण करुन खडीकरण केले. त्यानंतर त्यावर कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले. स्ववर्गणी व श्रमदानातून हे काम पूर्ण केल्याने कमी खर्चात झाल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. सलग दोन दिवस हे काम चालले. काम करता करता मित्रांनी जुन्या नव्या आठवणी जागृत करुन गेट टुगेदरचा आनंद लुटला.

"आम्ही म्हाळेवाडीकर व्हॉटसअॅप ग्रुपने गावच्या विकासकामांत योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांनी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी २ लाख ५० हजारांचा निधी दिला होता. तसेच गावातील प्रकाश पाटील अमृत दळवी या तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी ५१ हजारांची मदत केली आहे. ग्रुपचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे आहे."- सी. ए. पाटील, सरपंच, म्हाळेवाडी

loading image
go to top