esakal | ब्रेकिंग - कोल्हापूरकरांना दिलासा; राधानगरीचे दोन दरवाजे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

at midnight two gates closed of radhanagari dam in kolhapur

भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होवून पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे.

ब्रेकिंग - कोल्हापूरकरांना दिलासा; राधानगरीचे दोन दरवाजे बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेले दोन ते तीन दिवस राधानगरी  धरण क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणाचे चार दरवाजे खुले झाले होतो. मात्र कालपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे  सुरू असलेले दोन स्वयंचलित दरवाजे रात्री 12.30 वा.  बंद झाले. फक्त विजगृहातून 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात  ५८ मिमी इतक्या पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३७२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा - यंदा देखावे अन्‌ दर्शनही ऑनलाईन...! 

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. पावसाचा जोरामुळे धरणाचे चार दरवाजे खुले झाले होते. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.  

हेही वाचा -  100 वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचे नाव गाजवणारे दिनकर शिंदे...

नदीपरिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान कालपासून पावसाचा जोर कमी झाल्याने दोन दिवसांपूर्वी दोन दरवाजे बंद झाले होते. आणि उर्वरित दोन दरवाजे रात्री बंद झाले. यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होवून पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top