esakal | गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mill workers Demand houses in Mumbai Kolhapur Marathi News

गिरणी कामगारांना लॉटरी पध्दतीने दिली जाणारी घरे मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी अशी आग्रही मागणी सर्व श्रमिक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संघटनेचे दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. 

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चंदगड : गिरणी कामगारांना लॉटरी पध्दतीने दिली जाणारी घरे मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी अशी आग्रही मागणी सर्व श्रमिक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संघटनेचे दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. 

या प्राथमिक चर्चेत गिरणी कामगारांना घरे देण्याच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. अजूनही काही गिरणी मालकांनी जागेचा ताबा दिलेला नाही. तो त्वरीत घेणे गरजेचे आहे. त्यानंतर या जागेवर इमारती उभ्या करुन गिरणी कामगारांना घरे देता येतील. ही घरे मुंबई बाहेरच्या उपनगरांऐवजी मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी असा आग्रह संघटनेने धरला. त्याला मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे अत्याळकर यांनी सांगितले.

संघटनेच्या वतीने उद भट व संतोष मोरे यांनी बाजू मांडली. अनेक वर्षे मुंबईत घाम गाळलेल्या गिरणी कामगाराचे या शहरासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाचे मोल देणे हे शासनाचेही कर्तव्य आहे. त्या दृष्टीने शक्‍य तेवढे सहकार्य करण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली. आमदार आबिटकर यांनीही चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी तालुक्‍यातील गिरणी कामगारांचे प्रश्‍न मांडून ते सोडवण्याची मागणी केली. 

loading image