"पंडित नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचे अध्यक्षपद दिले. कारण, इतका विद्वान दुसरा माणूसच नव्हता. बाबासाहेबांनी अशी घटना दिली की ज्यामुळे देशात समता, बंधुता निर्माण झाली."
कोल्हापूर : ‘काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा निवडणुकीत पराभव केला. त्यांचे अंत्यसंस्कारही दिल्लीमध्ये होऊ दिले नाहीत. संविधानात १०६ वेळा बदल केला. त्यांनी सातत्याने डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला आहे,’ अशी टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.