सिद्धनेर्ली : ‘परमेश्वर व जनतेच्या आशीर्वादाने मी जर पुढे-मागे मुख्यमंत्री झालो, तर पन्नास हजार रुपये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) एक लाख रुपये देईन’, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. वंदूर (ता. कागल) येथे आयोजित सत्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते.