Hasan Mushrif : ऊसदर आंदोलन चिघळलं! मुश्रीफांनी स्वाभिमानीला केलं 'हे' आवाहन; म्हणाले, राजू शेट्टींनी बिनबुडाचे..

शेट्टींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामुळेच ऊसदराचे आंदोलन चिघळल्याचा आरोप केला होता.
Raju Shetti vs Hasan Mushrif
Raju Shetti vs Hasan Mushrif esakal
Summary

कर्नाटक सीमेलगतच्या कारखान्यांचे प्रचंड गाळप झाले असून, सीमेलगतचा ऊस प्रचंड प्रमाणात कर्नाटकच्या कारखान्यांना जात आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी बिनबुडाची विधाने करण्याऐवजी सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

शेट्टी यांनी सोमवार (ता. २०) पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामुळेच ऊसदराचे (Sugarcane Rate) आंदोलन चिघळल्याचा आरोप केला होता. याला मुश्रीफ यांनी उत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील कार्यक्रमांमध्ये राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली होती. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून कारखाने कसे कर्जात आहेत? किती कारखाने या दोन वर्षांमध्ये बंद पडणार आहेत? याची माहिती दिली होती.

Raju Shetti vs Hasan Mushrif
Bhogavati Election Results : पी. एन. पाटीलच ठरले भोगावती कारखान्याचे 'किंग'; विरोधकांचा सुपडासाफ, 24 जागांवर एकतर्फी बाजी

त्यानंतर आंदोलन सुरू झाले. जिल्हाधिकारी यांनी दोनवेळा, तसेच मी स्वतः पालकमंत्री म्हणून सर्व संघटना आणि कारखान्यांची बैठक घेतली. यावेळी काही निर्णय जाहीर केले होते. ज्या कारखान्यांची या हंगामाची एफआरपी २९५० रुपये किंवा ३००० रुपये जाहीर केलेली आहे, त्यांनी ३१०० रुपये तत्काळ द्यावेत. मागील वर्षाच्या साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे जो वाढावा मिळाला आहे, त्यामध्ये तडजोड करण्यास तयार आहोत, असेही सांगितले होते.

Raju Shetti vs Hasan Mushrif
Sadabhau Khot : राजू शेट्टींची 'ही' मागणी पूर्ण झाल्यास, मी राजकारण सोडतो; सदाभाऊंचं ओपन चॅलेंज

कारखान्यांचा ताळेबंद तपासल्याशिवाय याबाबतचा निर्णय होणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना व संघटनेच्या प्रतिनिधींची समिती नियुक्त केली. ज्या कारखान्यांचे उपपदार्थनिर्मिती प्रकल्प नाहीत, ते निव्वळ साखरनिर्मिती करतात. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे समिती नियुक्त करणे आवश्यक असल्याचे सर्वमत झाले होते. समितीच्या बैठकांना स्वतः राजू शेट्टी उपस्थित होते. सर्व वस्तुस्थिती संघटनेच्या निदर्शनाला आलेली असताना जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान करणे कितपत योग्य आहे?

पत्रकात पुढे म्हटले आहे, संताजी घोरपडे कारखान्याने एफआरपीपेक्षा २०० रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे. शेट्टी यांना कळकळीची विनंती केली होती की, हे वर्ष आंदोलनाचे नाही. कर्नाटक सीमेलगतच्या कारखान्यांचे प्रचंड गाळप झाले असून, सीमेलगतचा ऊस प्रचंड प्रमाणात कर्नाटकच्या कारखान्यांना जात आहे. तोडणी-वाहतूक यंत्रणा नजीकच्या कर्नाटक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जात आहे. या सर्वांमुळे कोल्हापूरचे कारखाने मोडून पडणार आहेत.

Raju Shetti vs Hasan Mushrif
आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार; ऊसदरावरुन शेट्टींचा आक्रमक पवित्रा

हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस परिषद घ्या

दरवर्षी कारखाने सुरू होण्यापूर्वी ऊस परिषद घ्या, अशी आमची विनंती असते. यापूर्वी साखर कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू व्हायचे. यावर्षी ते एक नोव्हेंबरला सुरू झाले आहेत, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com