चंदगड : नेत्यांचा आदेश धुडकावून राजीनामा न देण्यावर ठाम राहिलेल्या ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांना आज एका विवाह समारंभात मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चांगलेच बेदखल केले. काही तरी चर्चा करण्यासाठी पुढे सरसावलेल्या डोंगळे यांना मुश्रीफ यांनी चांगलेच फटकारल्याचीही चर्चा आहे.