esakal | तर... चंद्रकांत दादांचा सत्कार करु : मंत्री हसन मुश्रीफ
sakal

बोलून बातमी शोधा

Minister hasan mushrif comented on chandrkant patil phd statement

भाजपचे नेते पवार साहेबांवर पीएच.डी.करणार असतील तर कौतुकास्पद बाब आहे. पीएच.डी. केल्यानंतर दादांचा सत्कार करू, असा टोमणा मुश्रीफ यांनी मारला आहे.

तर... चंद्रकांत दादांचा सत्कार करु : मंत्री हसन मुश्रीफ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शरद पवार यांच्यावर पीएच.डी. करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही चांगली बाब आहे. पवार यांचा मोठा व्यासंग आहे. ते दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्यावर भाजपचे नेते पीएच.डी.करणार असतील तर कौतुकास्पद बाब आहे. पीएच.डी. केल्यानंतर दादांचा सत्कार करू, असा टोमणा मुश्रीफ यांनी मारला आहे.

हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला : शरद पवार

काय म्हणाले होते दादा...?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपाही देशावरची आपत्ती आहे असा केला होता. त्याबाबत विचारलं असता, “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण ते ५० वर्षे राजकारणात आहे तरीही त्यांचा पक्ष १० पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय? एकाचवेळी ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचे म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्याला उत्तर म्हणुन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

loading image