"गोकुळचे पाच लाख सभासद आहेत. त्यातील दोन लाख सभासदांनी प्रत्येकी एक म्हैस खरेदी केली तर आपण २५ लाखांचा टप्पा पूर्ण करू."
कोल्हापूर : ‘गाय दूध खरेदी दरात (Cow Milk Price) मंगळवार (ता. १) पासून दोन रुपयांची वाढ केली जाणार आहे,’ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन आणि सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोकुळ’च्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.