"मला चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न झाला. लोकही म्हणत होते, बदलाचे वारे दिसतेय; पण कोणी कितीही बदलू देत. जग बदलले तरी गोरगरीब जनता बदलणार नाही, याचा मला ठाम विश्वास होता."
कागल : ‘यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Kagal Assembly Elections) माझा पराभव करायचाच, यासाठी विरोधक पाच वर्षे मतदारसंघात फिरत होते. मला चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न झाला. लोकही म्हणत होते, बदलाचे वारे दिसतेय; पण कोणी कितीही बदलू देत. जग बदलले तरी गोरगरीब जनता बदलणार नाही, याचा मला ठाम विश्वास होता. तीच माझा श्वास आणि प्राण आहे,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.