सहपालकमंत्री निवडण्याची पद्धत ही नवीनच आहे. पूर्वी त्याच जिल्ह्यातील दुसरा मंत्री सहपालकमंत्री असायचा. मी मुंबईला गेल्यानंतर सहपालकमंत्रिपद नेमके काय आहे, हे समजून घेणार आहे, असे सांगत मुश्रीफ यांनी सहपालकमंत्री निवडीवरही आक्षेप घेतला.
कोल्हापूर : पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून घेतलेला आहे. आता मुख्यमंत्रीदेखील दावोसमध्ये आहेत. ते आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. मी, वीस वर्षे मंत्री आहे. त्यात मी चौदा महिने पालकमंत्री होतो म्हणजे जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे सांगत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आपल्या मनातील नाराजी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली.