सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला धोका नाही ; शंभूराजे देसाई

Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai visit on kolhapur
Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai visit on kolhapur
Updated on

कोल्हापूर : सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. राज्य सरकारने सुरुवातीला जी कारवाई केली ती योग्यच होती. या प्रकारणाचा सरकारला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी केले.  ते खासगी दौऱ्यासाठी कोल्हापुरात आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 
मंत्री देसाई म्हणाले, ""उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. त्याचवेळी याचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे दिला गेला. या प्रकरणात राज्य सरकारने योग्य ती कारवाई केली. त्यानंतर आता हा तपास एनआयएकडे दिला गेला आहे. विरोधक जरी सरकारवर आरोप करत असतील तरी या सरकारला धोका नाही.'' 


गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन

 वाझे यांच्या नियुक्तीबद्दल देसाई म्हणाले, ""एखादा अधिकारी निलंबित असतो, त्याची चौकशी सुरू असते त्या वेळी त्याला सेवेत घेण्याची कायदेशीर तरतूद आहे. कायदे, नियम पाळूनच वाझे यांना सेवेत घेतले आहे. एखादी व्यक्ती सेवेत नसताना कोणत्याही पक्षात जाऊ शकते. त्याप्रमाणे निलंबित असताना वाझे शिवसेनेत गेले. मात्र सेवेत आल्यानंतर राजकीय पक्षांशी कोणताही संबंध ठेवता येत नाही.'' 

सोमय्यांकडे दुर्लक्ष करा 
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्याबद्दल विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, ""किरीट सोमय्या रोज काहीतरी आरोप करतात. त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायचे नसते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.'' 


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khidrapur Kopeshwar Temple
Maharashtra heavy rain forecast today
Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Marathi News Esakal
www.esakal.com