esakal | काय अडचण आल्यास थेट मला फोन करा : राज्यमंत्री शंभुराजे देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

Minister of State Shambhu Raje Desai held an official meeting in Kolhapur

राज्यमंत्री देसाई यांनी विभागनिहाय आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने झालेली तरतूद, झालेला खर्च यांचा समावेश होता. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती यादव, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी माहिती दिली.

काय अडचण आल्यास थेट मला फोन करा : राज्यमंत्री शंभुराजे देसाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडा. विकासात्मक काम करताना अडचण आल्यास थेट मला फोन करा, त्या निश्‍चित सोडविल्या जातील; पण काम उठावदार झाले पाहिजे, कोणत्याही स्थितीत विकास निधी परत जाता कामा नये, अशा कडक सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या. शासकीय विश्रामगृहात आज गृह, वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकीत ते बोलत होते. 
बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव हे उपस्थित होते.

विविध विभागांचा घेतला आढावा

राज्यमंत्री देसाई यांनी विभागनिहाय आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने झालेली तरतूद, झालेला खर्च यांचा समावेश होता. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती यादव, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी माहिती दिली. देसाई यांनी जिल्ह्यातील ‘आयटीआय’ची संख्या, त्याची सद्यःस्थिती याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली. अकार्यक्षम संस्था बंद करण्याच्या सूचना कौशल्य विकास विभागाला दिल्या. 

वाचा - इंदुरीकर महाराज दोषी आढळल्यास कारवाई होईल : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई 

ग्रामीण भागात युवकांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. लवकरच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसाठी एकत्रित बैठक घेतली जाईल. जिल्ह्यासाठी गतवर्षीपेक्षा ६० कोटींचा वाढीव निधी दिला आहे. जिल्ह्यात विकासाचं काम चांगलं होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करणे अपेक्षित असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांना झापले

ज्या अधिकाऱ्यांनी खात्यांविषयी परिपूर्ण माहिती सादर केली नाही, अशा अधिकाऱ्यांना राज्यमंत्री देसाई यांनी झापले. माहिती नाही तर बैठकीला कशाला आलात, अशा शब्दात त्यांची कानउघाडणी त्यांनी बैठकीत केली.

डॉ. कलशेट्टींचे प्रभावी काम

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. आज बुके स्वीकारताना प्लास्टिकमुक्त बुके पाहून समाधान वाटले. आयुक्तांचे हे काम पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निश्‍चित पोहोचवू, असे देसाई यांनी सांगितले.
 

loading image