
कोल्हापूर : सोळा वर्षीय मुलाचे मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे, वर्गातील मुले चैनी करतात; पण आपल्याकडे पैसै नसल्याची खंत, घरच्यांकडे पैसे मागावेत तर वडिलांवरच घरखर्चाचा डोंगर, अशात केवळ संगतीमुळे त्याने चोरीचे धाडस केले. शेजारी गावी गेल्याचे पाहून गॅलरीच्या खिडकीतून शिरून दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. पिझ्झा खाण्यासह मॉलमध्ये खरेदीत पैसे खर्चू लागला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सोन्या मारुती चौकात झालेल्या १८ तोळे सोने चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.