जिल्हा परिषदेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Life Authority), जलजीवन मिशन, एमआयडीसी, महावितरण, तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजना (Jal Jeevan Mission Scheme) तत्काळ पूर्ण करा. या सर्व योजना सौरऊर्जा योजनेत असाव्यात यासाठी आराखडा तयार करावा. या सर्व योजनांना स्वच्छ, मुबलक आणि विना वीज बिलाच्या असाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (South Assembly Constituency) २२ गावांमधील योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी दिली.