आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
Updated on
Summary

हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर - काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांचे हैदराबाद इथं निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कारखान्यात आले असून काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आदींनी अंत्यदर्शन घेतले आहे.

आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
'आण्णां' ची झेप शुन्यातून विश्‍वाकडे !

आमदार जाधव निवासस्थानासमोर लोकांची गर्दी झाली असून उद्योजक, राजकीय क्षेत्रातील लोक येत आहेत. जाधव यांचे पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी त्यांच्या घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. ती कोल्हापूर उद्यम सोसायटी, जाधव आयर्न वर्क्स, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठेत येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.

आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
एका उमद्या सहकाऱ्याचं अवेळी निघून जाणं क्लेशदायक - CM ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vishwajeet Yadav Inspiring Journey to Mumbai Police Force
Kolhapur Gokul election political updates
Warna River crocodile alert news
Marathi News Esakal
www.esakal.com