Kolhapur : आमदारांच्या फार्महाऊसवरील लांडगा जेरबंद; बिबट्या आल्याची अफवा

लांडग्याला जेरबंद करण्यात वनखात्याच्या अधिकारी व कर्मचारयांना यश आले
Athani
Athanisakal

अथणी : आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या येथील फार्महाऊसमध्ये शनिवारी लांडगा आला होता. त्याला जेरबंद करण्यात वनखात्याच्या अधिकारी व कर्मचारयांना यश आले. बिबट्या आल्याची अफवा पसरली होती. पण फार्महाऊसमध्ये शिरलेला प्राणी लांडला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शनिवारी सकाळी ७.०० वाजता शिवयोगी नगरातील कुमठळ्ळी यांच्या फार्महाऊसवर बिबट्या आल्याची अफवा शहरात वाऱयासारखी पसरली. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सहकार्याने दीड तास शोधमोहीम राबवून लांडग्याला जेरबंद केले. यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

याआधी अथणी व कागवाड तालुक्यातील आवरकोड, कोकटनूर, कात्राळ, ऐनापूर, कृष्णा कित्तूर, सुत्तट्टी, मोळवाड, शेगुणसी या गावांमध्ये बिबट्या दिसल्याची अफवा पसरली होती. शनिवारी पुन्हा अशी अफवा पसरल्याने वातावरण चिंताग्रस्त होते.

वनाधिकारी प्रशांत गानिगेर म्हणाले, अथणी तालुक्यात बिबट्या आढळून आलेला नाही. आढळलेले पायाचे ठसे लांडग्याचे आहेत. वन्य प्राणी आढळल्यास कोणीही घाबरून न जाता माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावी.

लांडगा पकण्याच्या मोहिमेत डीसीएफ अँथनी मरियप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ सुनीता निंबरगी, एस. ए. मुंजे, एम. व्ही. पाटील, एस. ए. बागी, एम. सी. चौगला, ए. आय. दलायत, आर. एम. होसट्टी, नागप्पा आचरत्ती, एस. एम. घाडी, सुरेश पाटील, मुरुगेश ठकन्नवर, रघु. जी. ठकन्नवर, सिद्धप्पा शिरूर यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com