कोल्हापूर : ‘आतापर्यंत ईडीचा वापर केवळ राजकीयदृष्ट्या कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी अधिक केला गेला आहे. आता या कायद्यात बदल होत असतील, तर त्याचे स्वागतच आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. एमसीए-केडीसीए आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.