
किणी टोलनाक्यावर मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
किणी (कोल्हापूर) : पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याची 2 मे रोजी मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वाहतूक सेनेकडून आंदोलन (Kini Toll Plaza MNS Aandolan) करण्यात आलं.
अभिनव पध्दतीनं आंदोलन करत काही काळ टोल नाका बंद करण्यात आला. यावेळी मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर उभे राहून गाड्या सोडल्या. किणी आणि तासवडे टोलनाका राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडं वर्ग करण्यात आल्यानंतर या टोलनाक्यावरून पुन्हा वसुली करण्यात आलीय. महामार्गावरील सहा पदरीकरणाचं काम पूर्णत्वास गेलं नसतानाही टोलवसुली होत असल्याने मनसेकडून आंदोलन करण्यात आलं.
मनसेकडून टोल वसुली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सध्या टोलनाक्यावर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांनी धरपकड सुरुय. टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करत मनसेनं आमचं आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पोलिसांकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही मनसैनिकांकडून करण्यात आलाय. काल मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व टोलनाके बंद करु, असा इशारा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.