esakal | कुत्र्याला घेवूनच मनसेचे शिष्टमंडळ नगरपालिकेत
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्र्याला घेवूनच मनसेचे शिष्टमंडळ नगरपालिकेत

कुत्र्याला घेवूनच मनसेचे शिष्टमंडळ नगरपालिकेत

sakal_logo
By
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : शहरात अलीकडील काही महिन्यापासून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्‍न गंभीर बनत चालला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील मनसेचे शिष्टमंडळ कुत्र्याला सोबत घेवूनच पालिकेत गेले होते.

या मोकाट कुत्र्यांचा सकाळी फिरायला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक, महिलांसह लहान मुलांनाही त्रास होत आहे. यापूर्वी लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे भविष्यात असा गंभीर व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना राबवावी, अन्यथा नाईलाजाने संबंधित अधिकार्‍यांच्या खुर्चीला मोकाट कुत्री बांधण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, आता केवळ एक कुत्रा घेवून आलो होतो. यावर उपाययोजना तत्काळ केली नाही तर अधिकार्‍यांच्या खुर्चीला कुत्री बांधण्यासह ज्या प्रभागात मोकाट कुत्री आढळतील त्या प्रभागाच्या लोकप्रतिनिधींच्या दारात कुत्री घेवून जाणार आहे. प्रभात साबळे, शिवानंद मठपती, अविनाश ताशिलदार, प्राजक्ता पाटील, अमित चौगुले, निलेश माडभगत, अतिश पाटील, सतीश पाटील आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

loading image
go to top