

Monkey attack lockdown Solankur
Esakal
सोळांकूर, ता. २७ येथे सहा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या वानराला अखेर ग्रामस्थांनी जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात यश मिळविले. मात्र, या वानराच्या दहशतीमुळे निर्माण झालेली भीती कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत गावात लॉकडाउनसदृश परिस्थिती होती. दुपारनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले.