Kolhapur Rain : धरणांतील पाणी साठा वाढला, कोल्हापुरातील 14 बंधारे पाण्याखाली; शहर परिसरात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची दमदार सुरुवात झाली.
Monsoon Rain Kolhapur
Monsoon Rain Kolhapur esakal
Summary

मॉन्सूनचे (Monsoon Rain) आगमन लवकर होणार असून, यंदा शंभर टक्के मॉन्सूनचा पाऊस पडेल, असा अंदाज मे महिन्याच्या शेवटी वेधशाळेने वर्तवला होता.

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची दमदार सुरुवात झाली. गेल्या आठ दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. शहर आणि परिसरातही पावसाचा जोर कायम राहिला. धरणातील पाणीसाठी दिवसागणिक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधारा (Rajaram Bandhara) येथे रात्री आठ वाजता नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंच इतकी नोंदवण्यात आली. पावसाचा जोर असल्याने शेतात रोप लावणीच्या कामाची लगबग सुरू आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत.

मॉन्सूनचे (Monsoon Rain) आगमन लवकर होणार असून, यंदा शंभर टक्के मॉन्सूनचा पाऊस पडेल, असा अंदाज मे महिन्याच्या शेवटी वेधशाळेने वर्तवला होता. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची प्रतीक्षा होती. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने दमदार सुरुवात केली. धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून, अनेक ठिकाणी पाणी पात्राबाहेर आले आहे.

Monsoon Rain Kolhapur
Amba Ghat : 'या' कारणामुळे आंबाघाटात अनेक ठिकाणी अपघाताचा धोका; दरड कोसळण्याची भीती, खड्ड्यांत हरवला रस्ता

शहरातही दिवसभर पावसाने आपला खेळ सुरूच ठेवला होता. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत होता. पहाटे पाच वाजता पंचगंगेची पाणी पातळी १८ फूट होती. सातनंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. रात्री आठ वाजता नदी २० फूट ६ इंच इतकी होती. आज राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

शुक्रवारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता

शुक्रवारी (ता. ५) नक्षत्र बदलत असून, तरणा नक्षत्र सुरू होत आहे. हत्ती हे वाहन असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

Monsoon Rain Kolhapur
कोल्हापुरात चाललंय काय? राजारामपुरीत भरदिवसा पाठलाग करून तरुणाचा दगडाने ठेचून खून; मुरूम टाकून पुसले रक्ताचे डाग

हे बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणातील पाणीसाठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.78 टीएमसी, तुळशी 1.40 टीएमसी, वारणा 12.74 टीएमसी, दूधगंगा 5.10 टीएमसी, कासारी 0.98 टीएमसी, कडवी 1.33 टीएमसी, कुंभी 0.93 टीएमसी, पाटगाव 1.72 टीएमसी, चिकोत्रा 0.51 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.54 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.65 टीएमसी, आंबेआहोळ 0.90 टीएमसी, सर्फनाला 0.08 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.12 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 21.11 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 50 फूट, इचलकरंजी 47.8 फूट, तेरवाड 44 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 26 फूट, राजापूर 16.3 फूट तर नजीकच्या सांगली 9.9 फूट व अंकली 11 फूट अशी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com