वेदगंगा, दूधगंगेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ; महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम, आलमट्टीत किती टक्के साठा?

पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने नदीत पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे.
Krishna River
Krishna Riveresakal
Summary

आलमट्टीत २७ हजार ३८५ क्युसेक पाणी वाहून येत आहे, तर केवळ ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

चिक्कोडी : चिक्कोडी (Chikkodi) विभागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे लालसर पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामा वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत बुधवारी मोठी वाढ दिसून आली. कृष्णा नदीच्या (Krishna River) पातळीत वाढ होण्याची गती अधिक आहे. सध्या कृष्णा नदीत २६ हजारांवर क्युसेक पाणी वाहत आहे.

पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने नदीत पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. वेदगंगा व दूधगंगा नदीच्या (Vedganga and Dudhganga River) पातळीत संथ वाढ असली तरी कृष्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी कमी पाऊस असल्याने पाणी संथ वाढत होते.

Krishna River
शेतात खत घालायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; पाटील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत काळम्मावाडी धरण क्षेत्रात १२९ मिलिमीटर, तर राधानगरी धरण क्षेत्रात ८५ मिलिमीटर पाऊस झाल्याने आणखी दोन दिवस पाणी पातळी वाढणार आहे. त्याची दखल घेऊन प्रशासनाने पुन्हा पूरस्थितीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी कृष्णा नदीच्या पातळीची पाहणी केली. अंकली येथील पुलाजवळ कृष्णा नदीची ५१५.६१ मीटर पाणीपातळी साधारण आहे. येथे सध्या ५२६.५६ मीटर पातळी बुधवारी सकाळी ८ वाजता होती. येथे धोका पातळी ५३७ मीटरवर असल्याने सध्या कुठेही नागरिकांना भीतीची स्थिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Krishna River
Govindgad Fort : 'गोविंदगडा'चं ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित! कोकणातील गडावर सापडले तब्बल 'इतके' तोफगोळे

सदलगाजवळ दूधगंगा नदीची पातळी ५२५.१६ मीटर साधारण आहे. बुधवारी येथे ५३०.८० मीटर पाणी पातळी दिसून आली आहे. येथे धोका पातळी ५३८ मीटरवर असल्याने दूधगंगा व कृष्णा नदीकाठावर कुठल्याही प्रकारची भीती सध्या नसल्याचे चित्र आहे. पण, पाणी वाढत असल्याने व पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पंपसेट काढण्यासाठी व पुन्हा लावण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. सध्या राजापूर धरणातून २० हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत येत आहे. तर दूधगंगा नदीत ६ हजार ६८० क्युसेक पाणी वाहत आहे. दोन्ही नदींतून कृष्णेत २६ हजार ६८० क्युसेक पाणी वाहत आहे. दरम्यान, चिक्कोडी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प नोंदले गेल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

आलमट्टीत ३३ टक्के साठा

आलमट्टीत २७ हजार ३८५ क्युसेक पाणी वाहून येत आहे, तर केवळ ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आलमट्टीची सध्याची पाणीपातळी ५१२.०८ मीटर इतकी आहे. धरणात ४१.४११ टीएमसी (३३.६४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. आलमट्टीची उंची ५१९.६० मीटर, तर क्षमता १२३.०८१ टीएमसी इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com