कोल्हापूर : जिल्ह्यातील काही भागात आज पुन्हा वळवाने जोरदार (Kolhapur Rain) तडाखा दिला. शिरोळ आणि परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे फळबागांचे नुकसान झाले. काही भागात ऊसही आडवा झाला. सततच्या पावसाने उसाची भरणी खोळंबली. भुईमुगाचेही काही ठिकाणी नुकसान झाले.