कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी मॉन्सूनपूर्व (Monsoon Update) पावसाने दमदार हजेरी लावल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत (Panchganga Water level) वाढ होऊन ती १९.८ फुटांवर गेली. दरम्यान, जिल्ह्यातील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. राधानगरी, वारणा, दूधगंगेसह प्रमुख धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, मॉन्सूनपूर्व पावसाने घरांसह शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत.