गेल्या पाच- सहा वर्षांत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचा काय कारभार चालतो याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.
कोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे शंभर दूध संस्था (Dudh Sanstha) अवसायनात निघणार आहेत. त्या बंद केल्या जाणार आहेत. साधारणतः मार्चनंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दूध संकलन (Milk Collection) नाही, मतदार याद्या तयार नाहीत, यासह अन्य कारणांवरून या संस्था बंद होणार आहेत. जिल्हा दुग्ध उपनिबंधकांकडून ही कारवाई होणार आहे.