चिंताजनक ः कोल्हापूर जिल्ह्यात आहेत पन्नाशीच्या आतील 81 कोरोनाग्रस्त

Most covid cases in Kolhapur district are below fifties
Most covid cases in Kolhapur district are below fifties
Updated on

कोल्हापूर : संपूर्ण जगभर 60 वर्षे वयावरील आणि विविध आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका असल्याचे निष्कर्ष पुढे येत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याची आतापर्यंतची आकडेवारी पाहता हे आकडे वेगळेच काही सांगत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी आणि त्यांचे वय पाहता हा धोका पन्नाशीच्या आतील लोकांनाच जास्त असल्याचे दिसत आहे.

आजअखेर जिल्ह्यात कोरोनाचे 122 रुग्ण सापडले, यातील तब्बल 81 रुग्ण हे 21 ते 50 या वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासन व जिल्हा प्रशासन 50 वर्षांवरील ज्येष्ठांना त्यांची प्रतिकारशक्‍ती वाढावी म्हणून सर्वेक्षण करत आहे. त्यांना होमिओपॅथिक व आयुर्वेदिक औषधे देत आहे. त्यामुळे उपलब्ध आकडेवारीनुसार ही औषधे कोणाला द्यायची गरज आहे, याचा पुनर्विचार करावा लागण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाउनच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्‍यात होती. मात्र, तीन मे नंतर लॉकडाउनमध्ये सूट दिली. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले. यातही मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, बेळगाव या रेड झोनमधून हजारो लोक कोल्हापुरात आले. अनेक लोक परवानगीने आले, तर काहीजणांनी परवानगी न घेताच चोरवाटेने जिल्ह्यात प्रवेश केला. सध्या जे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते या सर्व रेड झोनमधून आलेल्या भागातील आहेत. मात्र, या बाधितांचा वयोगट बघता विविध निष्कर्ष निघत असून त्याचा आरोग्य यंत्रणेला विचार करावा लागणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने 50 वर्षे वयावरील सर्व नागरिकांची प्रतिकारशक्‍ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली. या समितीने आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचा डोस सुचवला आहे. त्याच्या खरेदीचे नियोजन सुरू आहे. जवळपास 11 लाख 50 हजार लोकांना हे औषध दिले जाणार आहे. मात्र, कोरोना बाधितांचा वयोगट पाहता ही औषधे आता 21 ते 50 वयोगटात द्यावी लागतील की काय? अशी परिस्थिती आहे. 

सध्या 50 वयाच्या आतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, येणारे बहुतांश हे प्रवासी आहेत. त्यामुळे ही संख्या दिसत आहे. प्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका आहे. मात्र, कोरोनाचा सर्वदूर प्रसार झाल्यानंतर जास्त वयाच्या लोकांना याचा धोका पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, येणाऱ्या आकडेवारीचा निश्‍चितच अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Latest Update
PM Kisan 2026 Kolhapur farmers e-KYC Aadhaar bank linking
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com