हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला

दरम्यान या घटनेत भक्ती गौतम जाधव बारा वर्षाची चिमुरडी बचावली.
हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता  वाचवायला

म्हाकवे : बाचणी (ता. कागल) येथील माय लेकरांचा अंगावर उच्च विद्युत वाहिनीची तार खांबावरुन तुटून पडल्याने शॉक लागून (kagal crime case) मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय 32) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय १४) असे मृत्यु झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत भक्ती गौतम जाधव बारा वर्षाची चिमुरडी बचावली. तिच्यामुळेच घटनेची माहिती घरी समजली.

घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, गेली दोन दिवस नळास पाणी न आल्याने गीता जाधव आपल्या दोन मुलांसह मंगळवारी (२०) रोजी सकाळी १० वाजता घराच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे कपडे धुण्यास गेल्या होत्या. ऊसाच्या शेतातून माघारी परतत असताना विजेची उच्च दाबाची विद्युत खांबावरील प्रवाहीत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. याचवेळी आईला वाचवण्यास गेलेला मुलगा हर्षवर्धन गौतम जाधव याला जोराचा शॉक बसल्याने माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने पुढे असणारी बारा वर्षाची मुलगी गौरी घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्याने बचावली.

हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता  वाचवायला
पुढचे 4 दिवस कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

गौतम जाधव यांचा मुलगा व पत्नीच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माय-लेकरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणकडून (mahavitran) संबंधित कुटुंबाला अंत्यविधीसाठी तातडीची मदत दिली आहे. सदर घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दतात्रय नाळे यांनी घटनेची पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे करत आहेत. घटनास्थळी महावीतरणचे उपकार्यकारी अभियंता पी. ए. उदगावे,कनिष्ठ अभियंता एस. एस. निकम, सहा अभियंता ए. डी. आंबवडे, सरपंच इक्बाल नायकवडी, उत्तम पाटील, पंडित कुंभार, दत्ता जाधव पोलीस पाटील नामदेव परीट आदी उपस्थिती होते.

'महावितरण कंपनीकडून पोलवरील खराब झालेल्या तारा तसेच विद्युत खांबाकडे दुर्लक्ष केले जाते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वेळीच लक्ष दिले गेले नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच बाचणी येथील मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या महावितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा.'

- अशोक पाटील, बेलवळेकर, शिवसेना कागल तालुकाध्यक्ष

हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता  वाचवायला
कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com