esakal | कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण

कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेला परिसर, देशी विदेशी पक्षांची कानी पडणारी साद, रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेले पठार, त्यामध्ये बागडणाऱ्या फुलपाखरांचे थवे, कोसळणारा झिम्माड पाऊस असे निसर्गसौंदर्याचे कोंदण लाभलेला कळंबा तलाव (kalamba lake) ओसंडून वाहू लागला आहे. दरम्यान चार दिवस पडणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे तलावाची पाणी पातळी (covid -19) 27 फुटांवर पोचली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

बेसुमार पाणी उपशामुळे गेली चार महिने तलावाचे पात्र कोरडे पडले होते. पाणी पातळीत मोठी घट झाली होती. मात्र दीड महिन्यांत समाधानकारक पाऊस पडल्यामुळे (rain in kolhapur) कळंबा तलाव तुडूंब भरला आहे. त्यामुळे शहरासह, कळंबा, पाचगावचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. कात्यायनी डोंगरांमधून तलावाला मिसळणारे अनेक ओढे-नाले आणि जयंती नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असून तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाचे संपूर्ण पात्र पाण्याखाली गेले असून पाणी पातळी 27 फुटावर पोहोचली आहे.

हेही वाचा: हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला

कळंबा तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा सांडवा नैसर्गिकरित्या पांढऱ्या शुभ्र जलधारांनी ओसंडून वाहत आहे. तलावाला मिसळणाऱ्या ओढ्या नाल्यात नागरिकांनी घन जैविक कचरा टाकल्याने पाण्याच्या प्रवाहाद्वारे तलावात साचला होता. पाण्याचे प्रदूषण वाढले होते. महापालिका प्रशासनाने हा कचरा वाहून जाण्यासाठी लहान सांडव्याचे बरगे काढले होते. तलावातील कचरा वाहून गेल्यानंतर मंगळवार (20) रोजी प्रशासनाने पुन्हा सर्व बरगे सांडव्याला घातले आहेत. कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पर्यटकांना (kalamba lake tourist) येथे येण्यास मज्जाव केला आहे. त्याचबरोबर मुख्य गेट बंद केले असून कर्मचारी तैनात केले आहेत.

कळंबा तलाव पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण

गेली दीड वर्षे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कळंबा तलाव परिसरात पर्यटकांना येण्यास महापालिकेने अनेक वेळा बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील हॉटेल व्यावसायिक व खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा: ‘ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात सजवलेल्या वाहनातून निघाली वारी

loading image