करंजफेण ते अनुस्कुरा मार्गावर खूप मोठ-मोठी झाडे आहेत. धोकादायक स्थितीत आहेत. काही झाडे तर पूर्णपणे वाळली असून, ती काढून टाकण्याची गरज आहे.
शाहूवाडी : गुढीपाडवा (Gudi Padwa) सणासाठी सुटीवर आलेल्या पत्नीला नोकरीच्या ठिकाणी सोडून गावी परतत असताना वाळलेल्या झाडाची (Tree) फांदी अंगावर पडल्याने कणेरीपैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथील धनाजी गोविंद पोवार (वय ३४) या युवकाचा मृत्यू झाला. कोल्हापूर अणुस्कुरा (Anuskura Ghat) मार्गावरील कांटे (ता. शाहूवाडी) येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.