कोल्हापूर : करवीरकन्या कस्तुरी सावेकरने माऊंट एव्हरेस्ट शिखर केले सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kasturi Savekar

कोल्हापूर : करवीरकन्या कस्तुरी सावेकरने माऊंट एव्हरेस्ट शिखर केले सर

कोल्हापूर: जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखरावर आज करवीरकन्या कस्तुरी सावेकरने भारताचा तिरंगा फडकवला. सकाळी सहाच्या सुमारास तिने ही मोहिम फत्ते केली. तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या टीममध्ये ती एकमेव भारतीय आहे. याबाबतची घोषणा फेसबुक पेजवरून नुकतीच करण्यात आली. दरम्यान, सावेकर कुटुंबीयांतर्फे मोहिमेबाबतची अधिकृत माहिती सायंकाळी पत्रकार परिषद घेवून दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि

२४ मार्चला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ती रवाना झाली. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी सर्वांत अवघड व खडतर असणाऱ्या दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा एक (उंची २६,५४५ फूट) निवडले आणि ते यशस्वीरित्या सर केले. वीस वर्षे सात महिन्यांची असणारी कस्तुरी हे शिखर सर करणारी जगातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली. त्यानंतर ती एव्हरेस्टच्या अंतिम चढाईसाठी रवाना झाली आणि आज तिने एव्हरेस्ट सर करून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

Web Title: Mount Everest Summit Karveerkanya Kasturi Savekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top