esakal | Good News; Video - जगभरातील गिर्यारोहन कोल्हापूरकरांसाठी होणार खुले
sakal

बोलून बातमी शोधा

Mountaineering Will be open for Kolhapur Climbing around world

असोसिएशनच्या माध्यमातून आता येथील गिर्यारोहकांना सर्व मोहिमांसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

Good News; Video - जगभरातील गिर्यारोहन कोल्हापूरकरांसाठी होणार खुले

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - जगभरातील कुठल्याही प्रकारचे गिर्यारोहन आता येथील गिर्यारोहकांसाठी खुले झाले आहे. कोणत्याही मोहिमेसाठी आवश्‍यक परवानग्यापासून ते साधनसामुग्रीपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी शासनाची अधिकृत मान्यता असलेली कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट माऊंटेनिअरींग असोसिएशन स्थापन झाली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील 74 संघटना एकवटल्या असून असोसिएशन शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. 

दरम्यान, असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रसिध्द दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके यांची तर उपाध्यक्षपदी हेमंत साळोखे यांची निवड झाली. सागर पाटील सचिव म्हणून काम पाहतील. कोषाध्यक्षपदी डॉ. विश्‍वनाथ भोसले, सहसचिवपदी राजेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्यासह ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव पोवार, दशरथ गोडसे, विनोद साळोखे आदींच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या स्थापनेची घोषणा आज करण्यात आली. 

डॉ. अडके म्हणाले, ""व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर दुर्गभ्रंमती, प्रस्तरारोहन, शिखर चढाई, अरण्यभ्रमण, गिर्यारोहनात कोल्हापूर गेली पाच दशके आघाडीवर आहे. पन्हाळा-पावनखिंड ही जगभरातील एकमेव सातत्यपूर्ण चालणारी ऐतिहासिक मोहीम आहे. मात्र, जगभरातील गिर्यारोहनासाठी टॅलेंट असूनही येथील गिर्यारोहकांना संधी मिळत नाही. त्यामुळे असोसिएशनच्या माध्यमातून आता येथील गिर्यारोहकांना सर्व मोहिमांसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. अखिल भारतीय गिर्यारोहन महासंघ ही महाराष्ट्र शासनाची अंगीकृत आणि अधिकृत अशी राज्य पातळीवरची शिखर संस्था असून या संस्थेशी कोल्हापूर असोसिएशन संलग्न आहे.'' 

असोसिएशनच्या कार्यकारी सदस्यांमध्ये नितीन देवेकर, विजय ससे, रामदास पाटील, साताप्पा कडव, महेश पाटील, प्रकाश मोरबाळे, सागर नलवडे, प्रशांत साळोखे, मुकुंद हावळ, ओंकार हावळ, सागर पाटील, योगेश रोकडे, सुजीत जाधव, यशपाल सुतार, सुचित हिरेमठ आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश असेल. जिल्ह्यातील जी मंडळी व्यक्तिगत किंवा संस्थात्मक पातळीवर मोहिमा आयोजित करतात. त्यांनी असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

हे पण वाचापरीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा! ; विद्यार्थ्यांची मागणी


 लवकरच मोहिमा 

जिल्ह्याचा विचार केला तर शाहूवाडी, चंदगड तालुक्‍यांत अनेक चांगले स्पॉट आहेत की जिथे साहसी पर्यटन किंवा साहसी खेळांवर भर देणे शक्‍य आहे. अशा पध्दतीची सुमारे 47 ठिकाणे असोसिएशनने निवडली असून लवकरच पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. त्याशिवाय कोरोना संसर्ग कमी होताच विविध मोहिमांनाही प्रारंभ होणार आहे. 

हे पण वाचाआरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप 

व्हिडिओ पाहा - 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top