...तर खासगी रुग्णालयांवर फौजदारी दाखल करू, इचलकरंजीत "या' खासदारांनी दिला इशारा

MP Dhairyashil Mane Said, ... Then We Will File Criminal Cases Against Private Hospitals Kolhapur Marathi News
MP Dhairyashil Mane Said, ... Then We Will File Criminal Cases Against Private Hospitals Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : शहरातील 32 खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने गंभीर रुग्णांची हेळसांड होणार नाही. याबाबतची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यावर पालिकेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी सहकार्य न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थीतीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

पालिकेच्या शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे आज ही बैठक झाली. बैठकीस माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यासह खासगी रुग्णालयाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थीत होते. 
बेड आरक्षीत करण्याऐवजी खासगी डॉक्‍टरांनी सुमारे 200 ते 250 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा पर्यायी प्रस्ताव ठेवला होता. त्यावरही चर्चा झाली. मात्र त्याला कालावधी जास्त लागणार असल्याने सध्या खासगी रुग्णालयातील बेड आरक्षीत करण्यावरच अंतिम निर्णय झाला. पालिकेच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवले जाणार असून शासनाच्या नियमानुसारच बिलाची आकारणी होईल, असे बैठकीत स्पष्ट केले. 

कोरोनाचे मोठे संकट शहरावर आले आहे. कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला खासगी डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. शासनाच्या नियमानुसार बेड आरक्षीत केले जाणार आहेत. त्याला सहकार्य न केल्यास संबंधित रुग्णालयांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्यासह पुढील ठोस कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी दिला. 

खासगी डॉक्‍टरांच्या सहकार्याने शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालण्यात यश मिळेल, असा विश्‍वास खासदार माने यांनी व्यक्त केला. बैठकीस अशोक स्वामी, शिक्षण सभापती राजू बोंद्रे, नगरसेवक रविंद्र माने, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड, शहाजी भोसले, उदयसिंह पाटील, सयाजी चव्हाण आदी उपस्थीत होते. 

जादा 446 बेड उपलब्ध होणार 
शहरातील 32 खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड अधिग्रहीत केले आहेत. त्यामुळे 446 बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली. 10 बेड पेक्षा जास्त असलेल्या खासगी रुग्णालयातील हे बेड आरक्षीत केले आहेत. गरज भासल्यास 10 पेक्षा कमी बेड असलेल्या रुग्णालयातील बेडही आरक्षीत केले जाणार आहेत. त्यामुळे आणखी 931 बेड उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com