esakal | 'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

mp sambhajiraje chhatrapati awareness for clean village

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले.

'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची रूपयांची कामे पूर्ण झाली आहेत. सरपंच सागर माने, भाग्यश्री फरांदे-पवार यांनी पत्रकार परिषदेत आज माहिती दिली. स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम स्पर्धा, व्याख्याने, शिबीरे व प्रशिक्षणे आयोजिले आहे. जिल्हा परिषद आरोग्य, स्वच्छता विभाग तसेच शिवाजी विद्यापीठ, गावातील सर्व मंडळे आणि हिवरेबाजार गावातील एक गट सहभागी होणार आहे. 

गाव सभा, बैठका, शाळांतर्गत जागृति घेतली जाणार आहे. दि. ते मार्च या कालावधीत शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी गावात राहाणार असून स्वच्छतेबाबत जागृती, प्रबोधन, व्याख्याने व पथनाट्य बसविण्याचे प्रशिक्षण देणा जिल्हा परिषद स्वच्छता विभागाच्या माध्यमातून सर्व गल्ल्यांत कच-याचे वर्गीकरण व व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

आठवडाभर कार्यक्रम होणार आहेत. महिलांसाठी विविध स्पर्धां होणार आहे. सर्व प्रकारच्या स्वच्छतांवर आधारीत पथनाट्य, घोषवाक्‍य, कविता, उखाणे आदी स्पर्धा होतील. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता विषयक निबंध, वक्तृत्व , चित्रकला स्पर्धा होणार आहे. 

गावातील गल्ल्यांमधून "सेल्फी वुईथ झाडू' ही अभिनव संकल्पना तरूण व शालेय विद्यार्थ्यांमार्फत राबविली जात आहे. ज्यामध्ये गल्लीतील सर्वजण दररोज गल्ली स्वच्छ करून त्याचा सेल्फी काढत आहेत व ग्रुपवर पाठवत आहेत. विशेष मार्गदर्शनासाठी हिवरे बाजार मधील गावक-यांचा एक गट येत असून गावाने एकजूटीने स्वच्छता कशी ठेवावी याबाबत प्रबोधन करणार आहे. 

पोलिस पाटील उज्वला पाटील, अमर पाटील, शाहीर शहाजी माळी, विश्वास निंबाळकर, संजय पोवार, उदय घोरपडे, पुरुषोत्तम गुरव, आनंदा तळेकर सुनिता चौगुले, जयश्री माने, स्वाती पाटील-सदस्या आदी उपस्थित होते. 


आठ मार्चला महिला दिन कार्यक्रम 
स्वच्छता संदेशावर आधारीत रांगोळी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांतील विजेत्यांना खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यातर्फे हिवरे बाजार व राळेगणसिद्धीची सहल घडविण्यात येणार आहे. आठ मार्चला महिला दिनाचा मुख्य समारंभ खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी होईल. डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रमूख मार्गदर्शन होईल. कार्यक्रमात गावातील यशस्वी महिलांचा सत्कार होईल.