कर्मचाऱ्यांनी नव्हे सभासदांनी निवडून दिले; खासदार संजय मंडलिक

बांधकाम व्यावसायिकांना कर्ज देण्याचा विचार; मुश्रीफ
Hasan Mushrif,Sanjay Mandlik
Hasan Mushrif,Sanjay MandlikEsakal

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या(KDCC Election) निवडणुकीत कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर नाही सभासदांच्या बळावर निवडून आलो. बॅंकेत कोणतेही धोरण ठरवा; पण जिल्ह्यातील सहकारी संस्था, प्रक्रिया संस्था, पतसंस्था, साखर कारखाने किंवा इतर संस्थांना आपण एकमताने ताकद दिली पाहिजे, असे आवाहन खासदार संजय मंडलिक(mp sanjay mandlik) यांनी आज केले. भविष्यात बांधकाम व्यावसायिकांनाही कर्ज देण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच ज्यांच्याकडे थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी लक्ष घातले जाईल, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ(hasan mushrif) यांनी आज घेतली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Hasan Mushrif,Sanjay Mandlik
विषय काय? 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय'; कोल्हापुरात एकच चर्चा

मुश्रीफ म्हणाले, ‘‘बॅंकिंगमध्ये डिजिटलायझेशन वाढल्याने कारभार काळजीपूर्वक करावा लागणार आहे. साडेसहा वर्षांपूर्वी प्रशासकीय काळातील आर्थिक गर्तेतून बॅंक बाहेर काढली आहे. साखर कारखाने बॅंकेचा मोठा ग्राहक आहे. साखर निर्मितीनिमित्ताने बॅंकेला व्यवसाय मिळत होता. आता साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यामुळे २१ दिवसांत बॅंकेचे पैसे परत केले जात आहेत. यातून जास्त व्याज मिळत नाहीत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जांमध्ये खावटी व मध्यम मुदत कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबई जिल्हा बॅंका ज्या प्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना जशी कर्ज देते त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना कर्ज दिले पाहिजे.’’

Hasan Mushrif,Sanjay Mandlik
रस्त्यांपासून वस्त्यांपर्यंत सारं काही एका क्लिकवर; पालिकेचा उपक्रम

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. ही बॅंके टिकली पाहिजे, वाढली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. स्वत: ढोल ताशे घेऊन ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी कर्ज वसुली करून थकबाकीदारांचा वाईटपणा घेतला. गरज असेल तरच कर्ज घेतले पाहिजे. आरबीआयकडून काही नियम-निकष आणले जातील. याचाही अंदाज घेतला पाहिजे.’’

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेत १२ संचालक थेट सेवा संस्थांमधून विजयी झाले आहोत. शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी जिल्हा बॅंकेने अर्थसाहाय्य केले पाहिजे. तसेच सेवा संस्थांनाही उभारी दिली पाहिजे.’’

Hasan Mushrif,Sanjay Mandlik
ह्रदयद्रावक! एका रात्रीत सतीशच्या निर्णयाने सोन्याचा संसार उध्वस्त; आठवणी सोडून सारं काही संपल

खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘बॅंकेच्या कारभारात गेल्या सहा वर्षांत संचालकांनी एकमताने निर्णय घेतले. त्यामुळे बॅंकेने प्रगतीची उत्तुंग भरारी घेतली आहे. बॅंक अधिक सक्षम व्हावी म्हणूनच आम्ही सत्तारूढ गटाच्या विरोधात निवडणूक लढलो. प्रचारामध्ये बॅंकेच्या कारभाराबद्दल एक चकार शब्दही काढला नाही. ९८ टक्के लोकांनी मतदान केले. ३८ टक्के मतदान आम्हाला मिळाले. गेल्या सहा वर्षांत प्रशासकीय अधिकारी धोरण ठरवतील तेच अमलात आणायचे असा निर्णय घेतला होता. हे धोरण चांगले होते. पण आम्ही कर्मचाऱ्यांच्या जीवावर निवडून येत नाही. सभासद आम्हाला निवडून देतात. धोरण काहीही ठरवा, पण सर्व संस्थांना ताकद देण्याचे काम केले पाहिजे.

आमदार विनय कोरे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच स्तरातील घटकांना न्याय देणारी बॅंक म्हणून जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते. आर्थिक गर्तेत अडकलेली बॅंक फायद्यात आणण्याचे काम मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. आता नव्या संकल्पनांची सुरुवात केली पाहिजे. कमी माणसात जास्त काम करता येईल का याचा विचार केला पाहिजे. सेवा देणारी संस्था म्हणून बॅंकेकडे पाहिले पाहिजे. बॅंकांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्याला सामोरे गेले पाहिजे.’’

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘देशात बॅंकांमधील (banking )स्पर्धा वाढत आहे. कर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना यामध्ये काही तरी सवलत दिली पाहिजे. भविष्यात शेतकऱ्यांचे पाच लाखांपेक्षा जास्त कर्ज बिनव्याजी द्यावे, असा निर्णय घेतला पाहिजे. खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्यांची बॅंक आहे हे दाखवून दिले पाहिजे.’’नूतन उपाध्यक्ष आमदार राजू आवळे म्हणाले, ‘‘कारभार पारदर्शक केला जाईल. शेतकऱ्यांसह सर्वच संस्थांना उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सभासदांच्या विश्‍वासास पात्र काम करू.’’माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटील, रणजीत पाटील, संतोष पाटील, रणवीरसिंह गायकवाड, ऋतिका काटकर, स्वाती गवळी आदी संचालक उपस्थित होते.

उपाध्यक्ष पाहायलाच नाही

जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील काही कारणांमुळे बॅंकेत उपस्थित नव्हते. आता मंत्री मुश्रीफ (hasan mushrif)यांनाही जास्त व्याप आहे. त्यामुळे आमदार राजू आवळे(mla raju awale) यांनी पूर्णवेळ उपाध्यक्ष म्हणून काम करावे, असे आवाहन मंडलिक यांनी केले. नूतन उपाध्यक्ष आवळे यांनी १० ते ५ बॅंकेत बसून बॅंकेचे काम पाहावे. कारण यापूर्वीचा उपाध्यक्ष बॅंकेत आल्याचे कधी पाहायलाच मिळाले नसल्याचा टोला यड्रावकर यांनी अप्पी पाटील यांचे नाव न घेता लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com