Solar Energy Complaints Kisan Sangh Meeting
sakal
कोल्हापूर - ‘सौर ऊर्जेविषयीच्या तक्रारी १५ दिवसांच्या आत निकाली काढू, अन्यथा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल. तसेच विद्युत वाहिनी तुटल्याने आग लागली, तर त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाईल,’ असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपती लटपटे यांनी दिले. भारतीय किसन संघासोबतच्या बैठकीत ते बोलत होते.