
प्रवीण देसाई
कोल्हापूर : महावितरणने जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात आठ हजार ६५७ ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्यात ऑनलाईन माध्यमांतून आलेल्या तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक आठ हजार ५७३ तक्रारी या महावितरण ऑनलाईन प्रणाली (सीआरएम) द्वारे मार्गी लागल्या आहेत. त्याचबरोबर अन्य सुविधांचा लाभ ही ग्राहकांना झाला आहे.