समीर शेख याच्या घरी सापडलेला गांजा त्याने मुंबई व नंदूरबारमधील डिलरकडून मागविल्याचे सांगितले. कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी पथके रवाना केली.
कोल्हापूर : गोव्याला गांजा पाठविणाऱ्या सातारामधील तिघांच्या टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch Police) ९१ किलो गांजा (Ganja Smuggling Case) जप्त केला. अटकेतील फैयाज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, कराड), सोहेल सलीम मोमीन (३३, रा. मोमीन मोहल्ला, उंब्रज) व समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख (२१, रा. रहिमतपूर, कोरेगाव) या तिघांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.