

Candidates reviewing ward-wise voting data after municipal election results.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभरात विविध उमेदवार व त्यांच्या पक्षांनी प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळात प्रचार पोहोचवला. मतदारांनी मतदान करावे, यासाठी मनधरणीपासून ते ‘रसद’ पुरविण्यापर्यंत विविध क्लृप्त्या लढविण्यात आल्या, तरीही अल्प मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांकडून मतदान नेमके कुठे कमी पडले, याचा शोध घेतला जात आहे.