

Political activity intensifies ahead of municipal elections as allegations
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या सत्तेच्या राजकारणातील ‘अर्थनाट्य’ सुरू झाले असून, ‘लक्ष्मीदर्शना’साठी कार्यकर्त्यांची प्रतीक्षा सुरू झाली आहे. पाकिटातून किती येणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. काही ठिकाणी घरटी पाचशे, तर दुसरीकडे दोन हजार रुपयांच्या पाकिटाची चर्चा सुरू झाल्याने, घेऊया की नको, असे प्रश्न आकाराला आले आहेत.