Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता
New Ward Geography Complicates Voter Math : गावठाण, उपनगर, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागांचा समावेश झाल्याने प्रभागातील प्रश्नांची व्याप्ती वाढली असून मतांची गोळाबेरीज हेच मोठे आव्हान ठरत आहे.
कोल्हापूर : नव्याने समाविष्ट झालेल्या भौगोलिक रचनेमुळे इच्छुकांच्या तोंडाला निवडणुकीपूर्वीच फेस येताना दिसत आहे. गावठाण व उपनगर असा संमिश्र प्रभाग झाल्याने तेथील प्रलंबित प्रश्नांचा आवाका मोठा आहे.