कणेरी (ता. पन्हाळा) येथील जंगलात २२ जानेवारीला अर्धवट सडलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह पन्हाळा पोलिसांना (Panhala Police) मिळून आला होता.
पन्हाळा : मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पन्हाळा पोलिसांनी कणेरी (ता. पन्हाळा) जंगलात (Kaneri Forest) सडलेल्या अवस्थेत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविली. आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न असताना संबंधिताचा खून झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले.