आजोबा शेजारच्या खोपीत होते. घरी कोणी नसताना त्याने शोभा यांचा गळा मागून दोरीने आवळला. काही वेळाने दोरी सैल केली; परंतु अजून श्वास सुरू असल्याने त्याने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला.
गडहिंग्लज : मुळात कर्जबाजारी, त्यात उसने घेतलेले दहा हजार रुपये (Money) वारंवार मागत असल्याने शोभा सदाशिव धनवडे (वय ६२) यांचा खून केल्याची कबुली अटक केलेला संशयित गुरुनाथ ऊर्फ पिंटू चौगुले (वय ३९, रा. हट्टी बसवाणा वसाहत, गडहिंग्लज) याने दिली आहे, अशी माहिती पोलिस (Gadhinglaj Police) उपअधीक्षक रामदास इंगवले व पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी येथे दिली.