

Mayor Contest Sets Stage
sakal
मुरगूड: येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अर्ज माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवारासह नगरसेवकपदाच्या ४६ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी दुरंगी होणार आहे.