शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन ; सात निकषांवर मूल्यांकन 

NAAC A Plus Plus Rating to Shivaji University education marathi news kolhapur
NAAC A Plus Plus Rating to Shivaji University education marathi news kolhapur
Updated on

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद ‘नॅक’च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने ३.५२ ‘सीजीपीए’ गुणांकनासह ‘ए प्लस प्लस’ मानांकन प्राप्त केले आहे. त्याचा फायदा संशोधक, विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच संलग्नित महाविद्यालयांना होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 


दरम्यान, ‘नॅक’च्या बदललेल्या नव्या निकषांतर्गत गुणांकन करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. प्रशासनाबाबत शिवाजी विद्यापीठाची एक स्वतःची अशी परंपरा आहे. प्रथम कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवारांपासून सर्वच कुलगुरूंनी त्याकामी योगदान दिलेले आहे. त्यांच्यासह सर्वच घटकांचे हे श्रेय असल्याचेही त्यांनी सांगितले.  
ते म्हणाले, ‘‘पुनर्मूल्यांकन फेरीअंतर्गत नॅक पिअर टीमने १५ ते १७ मार्च २०२१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाला भेट दिली.

‘नॅक’च्या नव्या निकषांनुसार विद्यापीठाने ‘नॅक’ला सादर केलेल्या स्वयंमूल्यनिर्धारण अहवालाचे (एसएसआर) सात निकषांवर सुमारे सातशे गुणांचे मूल्यांकन केले जाते. उर्वरित तीनशे गुणांचे मूल्यांकन पिअर टीममार्फत करण्यात येते. सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम वेगवेगळे उपक्रम यांचा समावेश असतो. त्यामध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती आणि उत्तम उपक्रम यामध्ये शिवाजी विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे.

या मानांकनाचे समाधान तर आहेच; पण आता ‘एनआयआरएफ’ मानांकनासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे.’’ यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ‘आयक्‍यूएसी’चे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते. प्रा. आर. के. कामत यांनी ‘नॅक’च्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. 

शिवाजी महाराजांना अभिवादन
मानांकन मिळाल्याची माहिती दुपारी दोनच्या सुमारास समजताच कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

प्रत्यक्ष भेटी टाळण्याचे आवाहन
‘नॅक’च्या मानांकनामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे; पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दूरध्वनी, ई-मेलद्वारे अभिनंदन करावे. प्रत्यक्ष भेटूनच अभिनंदन करण्याची जोखीम टाळावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी केले आहे.

असे झाले मूल्यांकन
एकूण सात निकषांवर मूल्यांकन झाले. त्यात अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन- नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहायता व प्रगती, प्रशासन- नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व वेगळे उपक्रम या निकषांचा समावेश होता. अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक चार ‘सीजीपीए’ गुण तर त्या खालोखाल संस्थात्मक मूल्ये व वेगळ्या उपक्रमांसाठी ३.८९ गुण मिळाले आहेत. विद्यार्थी सहायता व प्रगतीसाठी ३.७९, तर पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोतांसाठी ३.६५ इतके गुण मिळाले आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Market Yard rice theft case
Shahu Chhatrapati on Manoj Jarange maratha reservation
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vishwajeet Yadav Inspiring Journey to Mumbai Police Force
Marathi News Esakal
www.esakal.com